Panchaganga River : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ;कोल्हापूर-मिरज रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फटका रेल्वे सेवेला बसला असून मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाची पाणीपातळी धोक्याच्या दिशेने गेली आहे.
Panchaganga River
Panchaganga Riversakal
Updated on

मिरज : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फटका रेल्वे सेवेला बसला असून मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाची पाणीपातळी धोक्याच्या दिशेने गेली आहे. यामुळे कोल्हापूर-मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. तत्पूर्वी रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोमवारी पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाची पाहणी करून याबाबतचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाची सेवा थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. सन २०१९ आणि २०२१ साली कोल्हापूर सांगली जिल्ह्याला आलेल्या महापुरामध्ये मिरज ते कोल्हापूर दरम्यान लोहमार्गाचा भराव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्यानंतर तब्बल पंधरा दिवस रेल्वे सेवा टप्प करण्यात आली होती.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गेली आठवडाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर याचा फटका रेल्वे सेवेला बसण्याची शक्यता दाट आहे. या अनुषंगाने कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, यासह तब्बल दहा रेल्वेगाड्या मिरजेतून सुटण्याची शक्यता आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.

२०१९ आणि २०२१ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दक्षता

२०१९ आणि २०२१ या सालि कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेच्या नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे लोहमार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी रेल्वेचा भरीव वाहून गेल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होती. यानंतर रेल्वेने पुरेपूर दक्षता घेत 24 तास लोहमार्गावर लक्ष केंद्रित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.